फलाट क्र १८ च्या बाहेरील रेस्टॉरंट ऑन व्हील का होतोय फ्लाॅप

प्रतिदिनी जवळपास ५०० ते ५५० नागरिक याठिकाणी येत होते. मात्र सध्या केवळ २०० ते २५० नागरिक याठिकाणी येत आहेत
फलाट क्र १८ च्या बाहेरील रेस्टॉरंट ऑन व्हील का होतोय फ्लाॅप

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्र १८ च्या बाहेर रेस्टॉरंट ऑन व्हील ही आगळीवेगळी संकल्पना खवय्यांसाठी सुरु करण्यात आली. सुरुवातीच्या काळात उदंड प्रतिसाद मिळालेल्या या हॉटेलची ग्राहक संख्या मे महिन्यापासून जवळपास निम्म्यावर आली आहे. प्रतिदिनी जवळपास ५०० ते ५५० नागरिक याठिकाणी येत होते. मात्र सध्या केवळ २०० ते २५० नागरिक याठिकाणी येत आहेत.

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या १८ क्रमांकाच्या फलाटाबाहेर ’रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरु केले आहे. या संकल्पनेसाठी रेल्वेच्या जुन्या कोचचे रुपांतर रेस्टॉरंटमध्ये करण्यात आले आहे. ४० जणांच्या बसण्याची सोय असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये नागरिकांना शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये रेल्वे टूरिझम कॉर्पोरेशनने राबवलेल्या या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबईमध्ये देखील या संकल्पनेला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे सुरुवातीच्या काळात पाहायला मिळाले. ही संकल्पना नागरिकांच्या पसंतीस उतरल्याने सीएसएमटीप्रमाणे एलटीटी, कल्याण, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरीसह पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि सुरत स्थानकातही ’ रेस्टॉरंट ऑन व्हील’ उभारण्याचा हालचाली सुरू करण्यात आल्या. मात्र मागील महिन्याभरापासून सीएसएमटी येथील रेस्टॉरंट ऑन व्हीलकडे प्रवाशांनी चक्क पाठ फिरवली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in