दारुला पैसे दिले नाही म्हणून पत्नीची हत्या

पत्नीची हत्या करून पळून गेलेल्या माईनुउद्दीन नसउल्ला अन्सारी या आरोपी पतीला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली.
दारुला पैसे दिले नाही म्हणून पत्नीची हत्या

मुंबई : पत्नीची हत्या करून पळून गेलेल्या माईनुउद्दीन नसउल्ला अन्सारी या आरोपी पतीला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. दारुला पैसे दिले नाही म्हणून त्याने त्याची पत्नी परवीन मोईनुउद्दीन अन्सारी (२६) हिची बेदम मारहाण करून हत्या केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना गुरुवारी ७ डिसेंबरला गोरेगाव येथील पांडुरंगवाडीसमोरील रेल्वे कंपाऊंडमध्ये घडली. या कंपाऊंडच्या रुम क्रमांक पंधरामध्ये परवीन ही तिचा पती माईनुउद्दीनसोबत राहत होती. तो काहीच कामधंदा करत नव्हता. त्यातच त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे तो परवीनला घरकामासाठी पाठवून तिच्याकडून सतत दारुसाठी पैशांची मागणी करत होता. गुरुवारी त्याने तिच्याकडे दारुसाठी पैसे मागितले, तिने पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याने तिला बेदम मारहाण केली होती. त्यात ती बेशुद्ध झाली होती. या घटनेनंतर तो घरातून पळून गेला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच बोरिवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या परवीनला पोलिसांनी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी परवीनचा भाऊ अहमद शेख याच्या तक्रारीवरुन माईनउद्दीन अन्सारीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in