पत्नीची आत्महत्या; पतीला अटक

अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

मुंबई : पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला पंतनगर पोलिसांनी अटक केली. मोहन गोपाळ दांडगे असे या आरोपी पतीचे नाव असून, अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रोशनी मोहन दांडगे असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव असून, तिच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद घालून तिचा छळ केल्याचा मोहनवर आरोप आहे. मोहन हा रोशनीसोबत घाटकोपर येथील कामराजनगर परिसरात राहत होता. गेल्या वर्षी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता; मात्र लग्नानंतर तो तिचा क्षुल्लक कारणावरून छळ करत होता. तिला शिवीगाळ करून मारहाण करत होता. अनेकदा तो तिच्याकडून पैशांची मागणी करत असल्याने ती त्याच्या छळाला कंटाळून गेली होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने १ जानेवारीला तिच्या राहत्या घरी उंदीर मारण्याचे कीटकनाशक प्राशन केले होते. त्यामुळे तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. ही माहिती रोशनीची आई यशोदा कैलास तेलंग हिला समजताच ती अहमदनगर येथून मुंबईत आली होती. तिची पंतनगर पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत तिने मोहनने रोशनीला सतत मारहाण करून तिच्याकडे पैशांची मागणी करून तिचा मानसिक व शारीरिक शोषण केला. या छळाला कंटाळून रोशनीने लग्नाच्या अकरा महिन्यांत विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येला मोहन हाच जबाबदार असल्याचा आरोप करून त्याच्याविरुद्ध तकार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in