Mumbai : संचिता उगले प्रकरणाचे सत्य उलगडणार?

अभिनेत्री संचिता उगले हिच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली. अभिनेत्रीने मंगळवारी राहत्या घरात आयुष्य का संपवले? असा सवाल सध्या सर्व स्तरातून उपस्थित होत आहे. दरम्यान अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिच्या मृत्यू प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.
Mumbai : संचिता उगले प्रकरणाचे सत्य उलगडणार?
Mumbai : संचिता उगले प्रकरणाचे सत्य उलगडणार?
Published on

मुंबई : अभिनेत्री संचिता उगले हिच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली. अभिनेत्रीने मंगळवारी राहत्या घरात आयुष्य का संपवले? असा सवाल सध्या सर्व स्तरातून उपस्थित होत आहे. या प्रकरणात पोलीस तपासातून काय उघड होईल? पोलिसांना आतापर्यंत कोणते धागेदोरे सापडले आहेत? याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.

दरम्यान, संचिता उगलेच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. संचिता उगलेच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा, यासाठी अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष विनंती केली आहे. अभिनेत्री संचिता हिच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.

अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिच्या मृत्यू प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, संचिता उगलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी मागणी केली. त्यांनी या प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा, यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे.

सखोल चौकशी करा...

त्यांनी या पत्रातून संचिता उगले हिच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटनेने या प्रकरणातील सत्य समोर यावे आणि सर्व संबंधित बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

अभिनेत्री ६ महिन्यांपासून होती डिप्रेशनमध्ये

टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिने १४ जून रोजी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. साडीच्या सहाय्याने गळफास लावून तिने आयुष्य संपवले. तिच्या आत्महत्येची बातमी समोर येताच, सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. नातेवाईक किंवा इतर कलाकार मित्र मंडळींनी तिच्या विषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून अभिनेत्री डिप्रेशनशी लढत होती,

logo
marathi.freepressjournal.in