पावसाळा सुरू होताच वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या

विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तक्रारींचे निवारण केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
पावसाळा सुरू होताच वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या

पावसाळा सुरू होताच वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींचा पाऊस बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाकडे पडतो. यंदाच्या पावसाळ्यात १ ते १२ जुलैदरम्यान तब्बल ३,७२४ वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिळताच विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तक्रारींचे निवारण केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई शहरात बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. मुंबई शहरात तब्बल १० लाख वीजग्राहक आहेत. यात आठ लाख निवासी, तर दोन लाख व्यावसायिक वीजग्राहक आहेत. वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असतात. वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी नेहमीच बेस्ट उपक्रमाच्या नियंत्रण कक्षास प्राप्त होतात. विशेष करून पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याचा तक्रारींचा पाऊसच नियंत्रण कक्षात पडतो. यंदाच्या पावसाळ्यात १ ते १२ जुलै दरम्यान ३,७२४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, सगळ्या तक्रारींचे वेळीच निवारण केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in