ऐश्वर्या अय्यर/मुंबई
२४ मार्चच्या रात्री ५ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अवघ्या १२ तासांत चार महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फुगे घेण्यासाठी दुकानात गेली. मात्र, ती घरी परत आलीच नाही. त्यांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. ही मुलगी एका रिक्षात बसल्याचे एका व्यक्तीने सांगितले. ही मुलगी खुशबू गुप्ता ऊर्फ खुशी हिच्यासोबत होती. त्या रिक्षात आणखीही महिला होत्या. तिच्या पालकांनी तत्काळ भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्काळ चौकशी सूत्रे फिरवल्यानंतर खुशी हेच नाव माहिती पडले. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. तिचा मोबाईल क्रमांकाचे लोकेशन शोधायला सुरुवात केली. ती सापडल्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. खुशी (१९) तिची मैत्रीण मैना दिलोद (३९) यांच्यासोबत ती अपहृत मुलगी दिसली. आरोपींनी तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्यासोबत चालण्यास सांगितले. ती मुलगी खुशी हिला ओळखत होती. या अल्पवयीन मुलीला या दिव्य कैलाश सिंग व पायल शहा या दोन महिलांना विकायचे होते. या महिलांना २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. चारही महिलांना मंगळवारी कोर्टात सादर करण्यात येईल.