तुलसी एक्स्प्रेसमध्ये बलात्कार झाल्याचा महिलेचा आरोप; ठाणे रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल

ही महिला मॉडेल व पत्रकार असून लोकमान्य टिळक टर्मिनसहून ग्वाल्हेरला जाणाऱ्या तुलसी एक्स्प्रेसमध्ये बलात्कार झाल्याचा आरोप तिने केला आहे.
तुलसी एक्स्प्रेसमध्ये बलात्कार झाल्याचा महिलेचा आरोप; ठाणे रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
प्रतिकात्मक छायाचित्र

मेघा कुचिक/मुंबई :

लोकमान्य टिळक टर्मिनसहून ग्वाल्हेरला जाणाऱ्या तुलसी एक्स्प्रेसमध्ये १० मार्च रोजी बलात्कार झाल्याचा आरोप महिला प्रवाशाने केला आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी १७ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ही पीडिता चौकशीत सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही महिला मॉडेल व पत्रकार असून ती १० मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून ग्वाल्हेरला जायला निघाली. तिची गाडी सकाळी ८.१८ वाजता सुटली. तृतीय एसी डब्यात तिचे आरक्षण होते. एक्स्प्रेस सुटल्यानंतर ४० मिनिटांनी अज्ञात व्यक्तींनी तिला जेवण देण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. या आक्षेपार्ह कृतीचे त्यांनी चित्रीकरण केले.

प्रवासानंतर ३९ दिवसांनी तिने ग्वाल्हेर रेल्वे पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हा गुन्हा २१ दिवसांनी ठाणे रेल्वे पोलिसांत हस्तांतरित करण्यात आला. ही पीडित महिला तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

१९ एप्रिलला या पीडितेने ग्वाल्हेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. पोलिसांनी कलम ३२८ व कलम ३७६ नुसार गुन्हे दाखल केले. हा गुन्हा ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडला. त्यामुळे ग्वाल्हेर पोलिसांनी हा गुन्हा ठाणे रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरित केला. त्याची कागदपत्रे पोस्टाने पाठवण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in