दागिन्यांसह पळून गेलेल्या महिलेला आणि प्रियकराला अटक

अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे
दागिन्यांसह पळून गेलेल्या महिलेला आणि प्रियकराला अटक

मुंबई : सोन्याच्या दागिन्यांसह पळून गेलेल्या एका महिलेस तिच्या प्रियकरासह बोरिवली पोलिसांनी अटक केली. मोना संजय परमार आणि महेंद्र दिनेशभाई सोनी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी सव्वादहा लाखांपैकी काही दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मोना ही बोरिवलीतील गोराई परिसरात तिच्या पती, सासू-सासरे, दिर, त्याची पत्नी आणि मुलांसोबत सहकुटुंब राहत होती. तिचे महेंद्रसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे एप्रिल महिन्यांत ती पतीला सोडून महेंद्रसोबत पळून गेली होती.

यावेळी तिने कुटुंबातील सदस्यांनी तिच्याकडे सोपविलेले सुमारे सव्वादहा लाखांचे दागिने घेऊन पलायन केले होते. हा प्रकार जून महिन्यांत उघडकीस येताच तक्रारदारांनी त्याची वहिनी मोनाविरुद्ध बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीचीशहानिशा केल्यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.

logo
marathi.freepressjournal.in