अदानीच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या महिलेला अटक

अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्यापप्रकरणी सायेदा शाहीन अजीम खान या ५१ वर्षांच्या महिलेस मालवणी पोलिसांनी अटक केली.
अदानीच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या महिलेला अटक

मुंबई : अनधिकृत विजेचे कनेक्शन लावून फसवणूक होत असल्याने कारवाईसाठी गेलेल्या अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्यापप्रकरणी सायेदा शाहीन अजीम खान या ५१ वर्षांच्या महिलेस मालवणी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत तिचा पती आणि दोन अल्पवयीन मुले सहआरोपी असून पती अपंग असल्याने त्याच्यावर अद्याप अटकेची कारवाई केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मालवणी परिसरात काही स्थानिक रहिवाशी चोरीच्या विजेचा वापर करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अदानी कंपनीचे कर्मचारी तिथे कारवाईसाठी गेले होते. मात्र अजित खान यांच्या पत्नी आणि मुलांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. वातावरण चिघळल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमला संपर्क साधला. अखेर मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर याच गुन्ह्यांत सायेदा शाहीन हिला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in