अंधेरीतील स्पामधील सेक्स रॅकेटप्रकरणी महिलेस अटक

माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठविले होते
अंधेरीतील स्पामधील सेक्स रॅकेटप्रकरणी महिलेस अटक

मुंबई : अंधेरीतील स्पामधील सेक्स रॅकेटप्रकरणी नाजियाबानो हाफीजुद्दीन शेख या महिलेस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून, या तिघींनाही नंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी एक मोबाईल, पंधरा हजार रुपयांची कॅश, दोन मेकअप बॉक्स जप्त केला आहे. अंधेरीतील डोंगरी, हॉटेल विडलोरमध्ये ऑलिव्ह मिंट मसल रिव्हींग नावाचे एक स्पा असून, या स्पामध्ये मसाजच्या नावाने सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठविले होते. या वृत्ताला या ग्राहकाकडून दुजोरा मिळताच शुक्रवारी रात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाने कारवाई केली होती. या कारवाईत तीन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in