Mumbai : धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसूती; मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे बाळ-माता सुरक्षित

लोकमान्य टिळक टर्मिनस ते दिब्रुगड एक्स्प्रेसमध्ये एका गरोदर महिलेची सुरक्षितरीत्या प्रसूती करण्यात आली. रेल्वे कर्मचारी आणि सहप्रवाशांच्या मदतीमुळे या महिलेने एका सुंदर मुलाला जन्म दिला.
Mumbai : धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसूती; मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे बाळ-माता सुरक्षित
Published on

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस ते दिब्रुगड एक्स्प्रेसमध्ये एका गरोदर महिलेची सुरक्षितरीत्या प्रसूती करण्यात आली. रेल्वे कर्मचारी आणि सहप्रवाशांच्या मदतीमुळे या महिलेने एका सुंदर मुलाला जन्म दिला. शनिवारी भुसावळ आणि इटारसीदरम्यान ही घटना घडली. ट्रेनमधील रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता आणि संवेदनशीलता यामुळे धावत्या ट्रेनमध्येच बाळ आणि माता दोघांचेही प्राण वाचले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

ट्रेनमधील प्रवासी रवी चौधरी यांनी भुसावळ येथील मुख्य तिकीट निरीक्षक एस. पी. फिरके आणि तिकीट परीक्षक अंबरीश कुमार तिवारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांची पत्नी ज्योती हिला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे कर्मचाऱ्यांनी पावले उचलत ‘बी-६’ कोचच्या गॅलरीमध्ये बेडशीट आणि ब्लँकेटच्या मदतीने सुरक्षित आणि स्वच्छ जागा तयार केली. ट्रेन हरदा स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच सहप्रवाशांच्या मदतीने महिलेने एका निरोगी मुलाला जन्म दिला.

logo
marathi.freepressjournal.in