Mumbai Local : टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकल मध्येच बाळाचा जन्म

कसाऱ्याहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.
Mumbai Local : टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकल मध्येच बाळाचा जन्म

कसाऱ्याहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रीती वाकचौरे असे या महिलेच नाव आहे. ही गरोदर महिला आटगाव येथून मुंबईच्या दिशेने रुग्णालयात जात होती. या महिलेला टिटवाळा रेल्वे स्थानकात प्रसूती वेदना सुरू झाल्या. याबाबतची माहिती महिला प्रवासींनी तत्काळ रेल्वे पोलिसांना दिली. महिला रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांनी लगेच टिटवाळा रेल्वे स्थानकात धाव घेतली. या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला असून तिची व बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे. दोघांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in