अश्‍लील चाळे करून महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक

पोलिसांनी विनोद सरविया याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
अश्‍लील चाळे करून महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक

मुंबई : मद्यप्राशन केलेल्या महिलेशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ४० वर्षांच्या आरोपीला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. विनोद किसन सरविया असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिला ही मुंबईत एकटीच राहत असून तिच्या आईचे अलीकडेच निधन झाले होते. सफाईचे काम करून ती स्वत:चा उदरनिर्वाह करत होती. रविवारी ती दारूच्या नशेत मरीनड्राईव्ह येथील मेघदूत ब्रिजजवळ आली असताना तिचा परिचित विनोद तिला भेटला. तिने त्याच्याकडे दारूची मागणी केली. त्यानेही आधीच मद्यप्राशन केले होते, तरीही तो तिच्यासाठी दारू घेऊन आला. त्यानंतर या दोघांनी मद्यप्राशन केले. दारूच्या नशेत ती तिथेच झोपून गेली. याच संधीचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्‍लील चाळे केले. हा प्रकार तिथे गस्त घालणाऱ्या आझाद मैदान पोलिसांच्या निदर्शनास येताच त्याने विनोदची चौकशी केली. त्यानंतर महिलेसह त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.

शुद्धीवर आल्यानंतर तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनोद सरविया याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विनोद हा काहीच कामधंदा करत नसून मरिनलाईन रेल्वे स्थानकाजवळील मेघदूत ब्रिजखालील फुटपाथवर राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in