महिला सब इंस्पेक्टरला लाच म्हणून मोबाईल घेताना रंगेहाथ पकडले; झाली अटक

ठरल्याप्रमाणे तक्रारदार बुधवारी सॅमसंग कंपनीचा डमी मोबाईल घेऊन आंबोली पोलीस ठाण्यात गेले होते.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या राजश्री प्रकाश शिंत्रे यांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकरणी अटक केली. लाच म्हणून मोबाईल घेताना तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

यातील तक्रारदाराचा नेटवर्किंग इंटरनेटचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्यांची लोकल कोर्टाने जामीनावर सुटका केली होती. या गुन्ह्यांचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री शिंत्रे यांच्याकडे होता. या गुन्ह्यांत त्यांना मदत करण्याचे आश्वासन देऊन तिने त्यांच्याकडे मोबाईल स्वरुपात लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ३ मे रोजी राजश्री शिंत्रेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. त्यात तिने लाच म्हणून मोबाईल म्हणून स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे तक्रारदार बुधवारी सॅमसंग कंपनीचा डमी मोबाईल घेऊन आंबोली पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी मोबाईल घेताना राजश्री शिंत्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

logo
marathi.freepressjournal.in