
मुंबई : वांद्रे टर्मिनस येथे उभ्या असलेल्या उधना एक्स्प्रेसच्या रिकाम्या गार्ड डब्यात ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना २ फेब्रुवारीच्या पहाटे घडली. तपास पथकाने आरोपीला अटक केली.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, २५ वर्षीय आरोपी हमालीचे काम करत होता. रेल्वे पोलिसांनी इतर माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. पीडित महिला आणि तिचा जावई बांद्रा टर्मिनस येथे आरपीएफ कर्मचाऱ्यांकडे महिलेवर बलात्कार झाल्याची तक्रार पहाटे ४ वाजता दिली. पीडितेने सांगितले की, रिकाम्या उधना एक्स्प्रेसच्या गार्डच्या डब्यात तिच्यावर अत्याचार झाला. आरपीएफ व जीआरपीच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.