महिलेची वांद्रे वरळी सी-लिंकवर ट्रॅफिक पोलिसाशी अरेरावी ; म्हणाली, "नरेंद्र मोदी..."

पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली होती. यानंतर महिलेची जामीनावर सुटका केली गेली.
महिलेची वांद्रे वरळी सी-लिंकवर ट्रॅफिक पोलिसाशी अरेरावी ; म्हणाली, "नरेंद्र मोदी..."

वांद्रे वरळी सी-लिंकवर दुचाकीला बंदी आहे. असं असलं तरी जॉयराईडसाठी मोटारसायकल घेऊन जाणाऱ्या मध्य प्रदेशातील महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका वाहतूक पोलिसाने या महिलेला वांद्रे वरळी सी-लिंकवर जाण्यास रोखल. त्यानंतर महिला आणि वाहतूक पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी महिलेने थेट एक गन काढून पोलिसाला धमकावलं. दरम्यान, ती गन खरी नसून टॉयनग असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली होती. यानंतर महिलेची जामीनावर सुटका केली गेली.

या घटनेचा व्हिडिओ सोशळ मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून यात एक ट्रॅफिक पोलीस या महिलेला वरळी सी-लिंकवरुन जाण्यापासून रोखत आहे. पोलीस महिलेला दुचाकी बंद करण्यास सांगतात. तर ती महिला पोलीसाशी अरेरावी करण्यास सुरुवात करते. मी गाडी बंद करणार नाही. मी या देशाची नागरिक आहे आणि मी टॅक्स भरते. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. असं ही महिला ट्रॅफिक पोलिसाला सांगते. पुढे ही महिला म्हणते की, जा जाऊन नरेंद्र मोदींना फोन करा, त्यांनी जर मला सागितलं की गाडी बंद कर तरचं मी करणार, असं उद्धठपणे सांगितलं.

वरळी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली. यानंतर महिलेची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. ही महिला मध्य प्रदेशातील जबलपूरची असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिला वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन दुचाकीने प्रवास करण्यास बंदी असल्याचं तिला माहिती नव्हतं. निला नियमांबाबत माहिती नसल्याने तिला अडवल्याने राग अनावर झाला. आणि तिने

अरेरावी केली. वरळी पोलीसांनी महिलेला अटक करुन मोटारसायकल जप्त करुन महिलेला अटक केली. यानंतर न्यायालयात हजर केल्यावर महिलेची जामीनाव सुटका करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in