माहिती अधिकार अर्ज करण्यात महिला, तृतीयपंथी मागेच

ऑनलाईन पोर्टलवर अर्जदाराकडून माहिती अधिकारात अर्ज मागवताना महिला-पुरुषाचा उल्लेख देणे गरजेचे असते.
माहिती अधिकार अर्ज करण्यात महिला, तृतीयपंथी मागेच
PM

मुंबई : माहिती अधिकार हा सर्वसामान्य नागरिकांच्या हातातील महत्त्वाचा अधिकार आहे. सरकार स्तरावर होणाऱ्या विविध निर्णयांची माहिती यातून मिळते. आता माहिती अधिकार पोर्टलवरून माहिती अधिकाराचे अर्ज मागवण्यात पुरुषांच्या तुलनेत महिला व तृतीयपंथी मागेच असल्याचे उघड झाले.

नौदलाचे माजी कमोडोर लोकेश बत्रा यांनी सांगितले की, माहिती-अधिकारातून माहिती मागवण्यास पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी असल्याचे उघड झाले. जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान या अर्जांचा धांडोळा घेण्यात आला.

केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण खात्याच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एकूण २३,१७,५४० माहिती अधिकार अर्ज सादर केले. त्यातील १९,०५५,४३ अर्ज हे पुरुषांनी, तर ४,०९,२३३ अर्ज महिलांनी, तर २२२५ तृतीयपंथींनी केले.

महिलांचे माहिती अधिकार कायद्यातील माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीचे प्रमाण १७.६५८ टक्के आहे. महिला व तृतीयपंथींमध्ये माहिती अधिकाराच्या कायद्याचा वापर करण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. राज्य कारभारात महिला व तृतीयपंथींचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे, असे बत्रा म्हणाले.

ऑनलाईन पोर्टलवर अर्जदाराकडून माहिती अधिकारात अर्ज मागवताना महिला-पुरुषाचा उल्लेख देणे गरजेचे असते. लोकेश बत्रा यांनी गेल्या ३३ महिन्यांत किती स्त्री-पुरुषांनी माहिती अधिकाराचा वापर केला, ही माहिती मागवली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in