ग्रँट रोडला लाकडाच्या गोदामाला आग; एकाचा मृत्यू

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची माहिती मिळताच १६ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
ग्रँट रोडला लाकडाच्या गोदामाला आग; एकाचा मृत्यू

मुंबई : ग्रँट रोड परिसरात शुक्रवारी मध्यरात्री लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीचं कारण अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळण्याचे काम अजूनही सुरूच आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून प्लॅटिनम मॉल आणि रहिवासी इमारती रिकामी करण्यात आल्या आहे. १६ अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची माहिती मिळताच १६ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर ही आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले. लाकडाचे गोदाम या आगीत जळून खाक झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामास मध्यरात्री तीनच्या सुमारास लाकडाच्या गोदामाला आग लागली. लाकडाचे गोदाम असल्याने आग वेगाने पसरली. या आगीच्या परिसरात एकच खळबळ माजली. दरम्यान ही आग लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती कळवली. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in