घरात, कार्यालयात बसून काम होत नाही; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना चिमटा

मी डॉक्टर नसलो तरी दोन वर्षांपूर्वी एक ऑपरेशन ससेक्स केले....
घरात, कार्यालयात बसून काम होत नाही; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना चिमटा

गिरीश चित्रे / मुंबई

नायर रुग्णालयात दातांवर वेळीच उपचार होणार आहेत. दोन दिवसांत कवळी बसवणार असे अद्ययावत उपचार पालिकेच्या नायर रुग्णालयात दंत महाविद्यालयात होणार आहे. मी डॉक्टर नसलो तरी दोन वर्षांपूर्वी एक ऑपरेशन ससेक्स केले. केईएम रुग्णालयात ज्यावेळी फिरलो त्यावेळी सहा वॉर्ड बंद असल्याचे निदर्शनास आले. तातडीने काम हाती घेत वॉर्ड सुरू करण्याचे निर्देश दिले. शुक्रवारी सहाही वॉर्ड सुरू झाले आहेत. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना काय पाहिजे हे घरात, कार्यालयात बसून समजत नाही, असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना काढला. नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या ११ मजली इमारतीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, कुठल्याही क्षणी आचार संहिता लागू होणार आहे. त्यामुळे उद्घाटन, शुभारंभ असे कार्यक्रम हाती घेतले आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले. नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाची अद्ययावत इमारत रुग्ण सेवेत आली आहे. यामुळे मुंबईकरांसह लोकांना फायदा होणार आहे. काही लोकांचे हात दाखवण्याचे असतात तर काही लोकांचे हात खायचे असतात. मात्र अशा लोकांचा दंत महाविद्यालयात उपचार होतील की नाही हे सांगणं कठीण आहे, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

मुंबईकरांना मोफत औषधोपचारासाठी दोन हजार कोटी!

आरोग्य सुविधांवर वर्षभरामध्ये सुमारे ७ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये १ एप्रिलपासून झिरो प्रिस्क्रिप्शन धोरण अंमलात आणणार आहे. यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, मुंबईकरांना मोफत औषधोपचार मिळणार आहेत. आरोग्य सुविधेसाठी इतका मोठा निधी खर्च करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या आरोग्य सुविधांचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in