कल्याण-कसारा तिसरी लाईनचे काम; प्रगतीपथावर ७९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित

२३ गावांमधून हा रेल्वे मार्ग जाणार आहे
कल्याण-कसारा तिसरी लाईनचे काम; प्रगतीपथावर ७९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेचा विस्तार करणे शक्य नसले, तरी मुंबई बाहेर रेल्वेच्या विस्ताराचे काम सुरू आहे. कल्याण-कसारा दरम्यान तिसऱ्या लाईनचे काम प्रगतीपथावर ४९.२३ हेक्टर पैकी १३.२७ हेक्टर जमीन संपादन करणे शिल्लक आहे. तर ९ पैकी ५ पुलांचे काम प्रगतीपथावर असून, कल्याण कसारा तिसऱ्या लाईनसाठी ७९२.८९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

कल्याण-कसारा दरम्यान मध्य रेल्वेच्या सध्याच्या दोन रेल्वे मार्गांची गाड्या वाढीची क्षमता संपुष्टात आल्याने तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेच्या कामांना गती देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ४९.२३ हेक्टर जमीन संपादन करणे गरजेचे आहे. यापैकी ३५.९६ ( ३५ टक्के) जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित १३.२७ हेक्टर जमीन संपादन करण्याची प्रक्रियेला वेग मिळाला आहे. २०१६ मध्ये कल्याण-कसारा दरम्यान तिसरी मार्गिका आणि कल्याण-आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

३५ टक्केच जमीन हस्तांतरित

रेल्वेकडून ७९२ कोटींच्या खर्चाचा हा प्रकल्प सुरू करण्यात आला. रेल्वेकडून प्रकल्पाचे काम सुरू केल्यानंतर यासाठी खासगी आणि शासकीय जागांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली. परंतु, गेल्या पाच वर्षांपासून यापैकी जेमतेम ३५ टक्केच जमीन रेल्वेकडे हस्तांतरित झाली आहे. त्यामुळे उर्वरित १३.२७ हेक्टर जमीन हस्तांतरणाचा प्रश्न निकाली निघणे आहे. २३ गावांमधून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. यापैकी १४ गावांमधील शासकीय मालकीच्या जागा रेल्वेकडे नुकत्याच सुपूर्द करण्यात आल्यामुळे या रेल्वे मार्गाचा शासकीय जागांचा अडथळा दूर झाला आहे. परंतु कल्याण, शहापूर आणि उल्हासनगर येथील काही खासगी जागांचे हस्तांतरण अद्याप रखडल्याचे समजते.

'असे' होतंय काम

-लांबी- ६७.३५ किमी

-किंमत- ७९२.८९ कोटी

-एकूण जमीन संपादित करणे- ४९.२३ हेक्टर

-भूसंपादन पूर्ण- ३५.९६ हे. (७३ टक्के)

-शिल्लक भूसंपादन- १३.२७ हेक्टर (२७ टक्के)

logo
marathi.freepressjournal.in