कंत्राटी चालकांचे काम बंद आंदोलन सुरू

वेतन वेळेवर न मिळाल्याने माधव ग्रुपच्या चालकांनी पुन्हा एकदा रविवारपासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे
कंत्राटी चालकांचे काम बंद आंदोलन सुरू
Published on

वेळेवर वेतन मिळत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावर चालवणाऱ्या चालकांनी चार दिवस काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यावेळी वेतन वेळेत देण्यात येईल, असे आश्वासन कंपनीने दिल्याने आंदोलन मागे घेतले होते; मात्र पुन्हा एकदा वेतनाचा प्रश्न उपस्थित झाल्याने कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

वेतन वेळेवर न मिळाल्याने माधव ग्रुपच्या चालकांनी पुन्हा एकदा रविवारपासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. रविवारी वडाळा आगारातून एम. पी. ग्रुपच्या नियोजित ४८ बसगाड्या बसचालक कामावर न आल्यामुळे चालवण्यात आलेल्या नाहीत. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्टच्या २९ बसगाड्या चालवल्या. सोमवारीही वडाळा आगारातून एम. पी. ग्रुपच्या ६३ बसगाड्या बसचालक कामावर न आल्यामुळे चालू शकल्या नाही. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी २७ बसगाड्या चालवल्या. दरम्यान, कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन केल्याने कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच चालकांना वेळीच वेतन देण्याबाबत निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in