
मुंबई : निर्माणाधीन इमारतीच्या २०व्या मजल्यावरून पडून शुकूर कामराज शेख या ३० वर्षांच्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी भायखळा परिसरात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध आग्रीपाडा पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविला आहे.
युनिक इन्फ्राकेयर कंपनीचे मालक फरकान खलील अब्राहम, कॉन्ट्रक्टर नासीर एनामुल शेख, रोहन किशोर राऊत आणि मुज्जमिल आरिफ शेख अशी या चौघांची नावे आहेत. भायखळा येथील हिना बेकरीसमोरील रिलायबल इंटरप्रायजेस परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरु असून तिथेच शुकूर शेख हा कामाला होता. काम करताना त्याचा तोल गेला आणि २०व्या मजल्यावरून खाली पडला. त्याला नायर रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.