आठव्या मजल्यावरून पडून 'कामगाराचा' मृत्यू

मृत्यूप्रकरणी बांधकाम साइटच्या कॉन्ट्रॅक्टरसह सुपरवायझरविरुद्ध जुहू पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे.
आठव्या मजल्यावरून पडून 'कामगाराचा' मृत्यू

मुंबई : विलेपार्ले येथे आठव्या मजल्यावरून पडून ३३ वर्षांच्या कामगाराचा मृत्यू झाला. मिनारूल अब्दुल रौफ शेख असे या मृत कामगाराचे नाव असून, त्याच्या मृत्यूप्रकरणी बांधकाम साइटच्या कॉन्ट्रॅक्टरसह सुपरवायझरविरुद्ध जुहू पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. मोहम्मद अय्याज सोलंकी आणि सिराज्जुल शेख अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ६१ वर्षांचे तक्रारदार अब्दुल रौफ तोयब शेख हे अंधेरी येथे राहत असून, मृत मिनारुल हा त्यांचा मुलगा आहे. ते दोघेही कॉन्ट्रॅक्टर मोहम्मद आयाजकडे बिगारी कामगार म्हणून कामाला होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्याची विलेपार्ले येथील लल्लूभाई पार्क, उषा-किरण इमारतीच्या बांधकाम साइटवर काम सुरू होते. गुरुवारी १ जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता मिनारुल हा लिफ्टमधून सामान ने-आण करत होता. यावेळी आठव्या मजल्यावरून पडून तो गंभीररीत्या जखमी झाला.

logo
marathi.freepressjournal.in