वाशी खाडीवर बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलावरून पडून कामगाराचा मृत्यू

वाशी खाडीवर उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलावर वेल्डिंगचे काम करणारा तरुण सेफ्टी बेल्ट अडकवलेल्या लोखंडी प्लेटसह घसरून खाडीमध्ये पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
वाशी खाडीवर बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलावरून पडून कामगाराचा मृत्यू

नवी मुंबई : वाशी खाडीवर उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलावर वेल्डिंगचे काम करणारा तरुण सेफ्टी बेल्ट अडकवलेल्या लोखंडी प्लेटसह घसरून खाडीमध्ये पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. अमन सहानी (२४) असे या तरुणाचे नाव असून, वाशी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून या प्रकरणाच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या दुर्घटनेत मृत झालेला अमन सहानी हा तरुण मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील असून, सध्या तो मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमध्ये कामगारांसाठी असलेल्या घरामध्ये राहण्यास होता. तसेच तो वाशी खाडी पुलावर एल ॲण्ड टी कंपनीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलावर काम करत होता. शुक्रवारी दुपारी अमन हा नवीन खाडी पुलावर वेल्डिंगचे काम करत होता. यावेळी अमनने ज्या लोखंडी फ्लेटला सेफ्टी बेल्ट अडकवला होता, त्या लोखंडी फ्लेटसह तो घसरून खाडीमध्ये पडला. यावेळी इतर कामगारांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तत्काळ खाडीमध्ये उडी टाकून त्याला बाहेर काढले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in