इमारत तोडताना पडून कामगाराचा मृत्यू

याप्रकरणी नवघर पोलिसांनी दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे.
इमारत तोडताना पडून कामगाराचा मृत्यू

मुंबई : इमारत तोडताना तिसऱ्या मजल्यावरून पडून अब्दुल रकिब मोहम्मद इलियास या कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी नवघर पोलिसांनी दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. या दोघांमध्ये कॉन्ट्रक्टर मोहम्मदअली मुस्तकीम खान आणि सुपरवायझर बिलाल कमालउद्दीन मलिक यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अब्दुल इलियास हा मूळचा उत्तरप्रदेशच्या बलरामपूर, बदलपूरचा रहिवाशी असून, तो मुंबई शहरात मजुरीचे काम करतो. गेल्या काही महिन्यांपासून अब्दुल हा कॉन्ट्रक्टर मोहम्मदअली आणि सुपरवायझर बिलाल यांच्याकडे कामाला होता. त्यांना मुलुंड येथील म्हाडा कॉलनी, ट्रॉन्झिंट कॅम्पची एक इमारत तोडण्याचे कंत्राट मिळाले होते. तिथेच सध्य अब्दुल हा त्याचा मेहुणा नफीस अहमद हसीब अहमद याच्यासोबत कामाला होता. सोमवारी १८ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता अब्दुल हा इतर सात कामगारांसोबत इमारत तोडण्याचे काम करत होता. यावेळी इमारतीचा स्लॅब तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in