मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंना दणका; वरळीतील 'हा' नेता शिंदे गटात

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील एक माजी नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केला आहे
मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंना दणका; वरळीतील 'हा' नेता शिंदे गटात

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून अनेक ठाकरे गटातील नेत्यांनी इतर पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अशामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील एक नेता शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळी मतदारसंघातील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला असून हा आदित्य ठाकरेंना खूप मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

संतोष खरात हे शिंदे गटात प्रवेश करणारे पहिले माजी नगरसेवक ठरले आहेत. ते वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल २२ नगरसेवक पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, २२ पैकी ६ नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. ते शिंदे गटात प्रवेश करणार की नाही? याबाबत मात्र काही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मुंबई, ठाण्यामध्ये येत्या काळात अनेक धक्के महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in