मुंबईतील वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यात येणार

मुंबईतील वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यात येणार
Published on

दक्षिण मुंबईतील वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, बेसॉल्ट दगडाच्या पायवाटा, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. ३४७ वर्षे जुन्या किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार असून, स्थानिक शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री सचिन अहिर, माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर व हेमांगी वरळीकर, जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे व मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते.

मुंबईतील गड-किल्ल्यांचा तरुण पिढीला इतिहास कळावा, यासाठी किल्ल्यांची डागडुजी, सुशोभीकरण करण्यात येत आहे. वरळी किल्ला ३४७ वर्षे जुना असून तब्बल ३४७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वरळी किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्याचे निर्देश पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाद्वारे वरळी किल्ल्याचा जीर्णोद्धार व सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. टप्पेनिहाय किल्ल्याचे काम करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in