%20(1)%20(1).avif?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
%20(1)%20(1).avif?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mihir Shah: मुंबई : वरळी येथे बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेणाऱ्या मिहीर शहाने हायकोर्टात धाव घेत पोलिसांच्या कारवाईला आक्षेप घेणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर २१ ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मिहीरने ७ जुलैला दारूच्या नशेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू गाडी चालवली आणि वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला जोरदार धडक दिली. त्यात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. मिहीरने गाडीखाली चिरडलेल्या कावेरी यांना निर्दयीपणे वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत फरफटत नेले होते. घटनेनंतर फरार झालेल्या मिहीरला ९ जुलैला विरारच्या रिसॉर्टमधून पोलिसांनी अटक केली. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या मिहीरच्या वतीने ॲड. नेहा पाटील यांनी जामीन अर्ज करण्यापूर्वी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे.