वरळीत एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १४०७ कोटींचे ड्रग्जचा साठा जप्त

२७ जुलैला रेश्माला अटक केल्यानंतर तिने रियाज आणि प्रविणकुमार हे दोघेही मुख्य आरोपी असल्याचे चौकशीत सांगितले
वरळीत एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १४०७ कोटींचे ड्रग्जचा साठा जप्त

एमडी ड्रग्जची मुंबईसह इतर शहरांत विक्री करणाऱ्या एका टोळीचा वरळी यूनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी १४०७ कोटी ९९ लाख रुपयांचा ७०१ किलो ७४० ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे.

शमशुल्ला ओबेदुल्ला खान, आयुब अहमद शेख, रेश्मा चंदनकुमार चंदन, रियाज मेमन आणि प्रवीणकुमार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २७ जुलैला रेश्माला अटक केल्यानंतर तिने रियाज आणि प्रविणकुमार हे दोघेही मुख्य आरोपी असल्याचे चौकशीत सांगितले होते. या दोघांकडे कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा असून टप्याटप्याने त्याची विक्री सुरू असल्याचे तिने सांगितले होते. पोलिसांनी विशेष मोहीम राबवत रियाज आणि प्रविणकुमार या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ७०१ किलो ७४० ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत १४०३ कोटी ४८ लाख रुपये आहे. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत आतापर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ७०४ किलो ८४० ग्रॅम वजनाचा एमडी साठा जप्त केला आहे. त्याची किंमत १४०७ कोटी ९९ लाख ५० हजार ९०० रुपये आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in