वरळी, विक्रोळी, अंधेरीकरांना मिळणार स्विमिंग पूल

तिन्ही तरणतलाव लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या तरणतलावाच्या ठिकाणी सदस्य नोंदणी ही ऑनलाईन असेल
वरळी, विक्रोळी, अंधेरीकरांना मिळणार स्विमिंग पूल

मुंबई : सृदृढ आरोग्यासाठी स्विमिंग हा उत्तम व्यायाम आहे. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत मुंबई महापालिकेने स्विमिंग पूल निर्मितीवर भर दिला आहे. वरळी, विक्रोळी, अंधेरी या ठिकाणी स्विमिंग पूल उभारले असून, पुढील काही दिवसांत तिन्ही स्विमिंग पूल सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने आणखी तीन नवीन जलतरण तलावांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. वरळी टेकडी जलाशयाच्या ठिकाणी, विक्रोळीतील टागोर नगर आणि अंधेरी पूर्व येथील कोंडिविटा आदी परिसरांमध्ये हे जलतरण तलाव सुरू केले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या वतीने मागील वर्षी मार्च महिन्यांमध्ये अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथील जलतरण तलावाचे लोकार्पण उपनगराचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर आता आणखी तीन जलतरण तलावांचे लोकार्पण येत्या काही दिवसांमध्ये केले जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून विक्रोळी टागोर नगर, अंधेरी पूर्व येथील कोंडिविटा आणि वरळी टेकडी जलाशय परिसरातील जलतरण तलावांचे बांधकाम सुरू होते. या तिन्ही तरणतलावांचे बांधकाम पूर्णत्वास आले असून, लवकरच तिन्ही तरणतलावांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

ऑनलाईन सदस्य नोंदणी!

वरळी, विक्रोळी आणि अंधेरी पूर्व येथील या जलतरण तलावांचे बांधकाम पूर्ण झाल्याने पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये ते सुरू होणे अपेक्षित आहे. तिन्ही तरणतलाव लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या तरणतलावाच्या ठिकाणी सदस्य नोंदणी ही ऑनलाईन असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in