जेष्ठ नागरिकांसाठी वरळीत इलेक्ट्रिक वाहन; घर ते बसस्टॉपपर्यंत पालिकेची सेवा

वरळीतील जेष्ठ नागरिकांसाठी ८ आसनी इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध करण्यात येणार आहे.
जेष्ठ नागरिकांसाठी वरळीत इलेक्ट्रिक वाहन; घर ते बसस्टॉपपर्यंत पालिकेची सेवा

मुंबई : मुंबईतील जेष्ठ नागरिकांसाठी मुंबई महापालिकेने वरळीत अनोखा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. वरळीतील जेष्ठ नागरिकांसाठी ८ आसनी इलेक्ट्रिक वाहन उपलब्ध करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या जी. उत्तर विभागाच्या माध्यमातून घर ते बसस्टॉप अशी सेवा उपलब्ध होणार आहे.

जेष्ठ नागरिकांसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. वरळीत प्रथमच इलेक्ट्रिक वाहन सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. कोळीवाड्यातील रहिवाशांना बसस्टॉपपर्यंत पोहोचण्यासाठी किमान अर्धा ते एक किलोमीटरची पायपीट करावी लागते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होते. शिवाय रुग्णांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये रुग्णांना अ‍ॅम्ब्युलन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे.

असे आहे वाहन

वरळीत आणल्या गेलेल्या या वाहनांमध्ये एका वेळी आठ जणांना प्रवास करता येणार आहेत. यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर खरेदी करण्यात आलेल्या दोन वाहनांच्या वर्षभराच्या देखभालीसाठी पालिका १६ लाख रुपयांचा खर्च करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in