'स्वराज्यरक्षक संभाजी' मार्केटेबल टायटल; 'धर्मवीर' वादावर काय म्हणाले विश्वास पाटील?

पानिपत, संभाजी या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे लेखन करणाऱ्या विश्वास पाटील यांनी धर्मवीर वादावर केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत
'स्वराज्यरक्षक संभाजी' मार्केटेबल टायटल; 'धर्मवीर' वादावर काय म्हणाले विश्वास पाटील?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत 'छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते' असे वक्तव्य केले होते. यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिंदे गट यांनी त्यांच्याविरूद्ध आंदोलने केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांच्या या विधानाला समर्थनही मिळाले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणाले की, 'छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षकच होते.' यानंतर या सर्व वादामध्ये आता कादंबरीकार, लेखक विश्वास पाटील यांनीदेखील उडी मारली असून त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत आपले मत मांडले आहे. यामध्ये त्यांनी, 'राज्याच्या इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांना 'धर्मवीर' म्हणत असल्याचे कागदी पुरावे आहेत' असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

विश्वास पाटील फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, "गेली शंभरहून अधिक वर्षांपासून अवघा महाराष्ट्र शंभूराजांचा उल्लेख 'धर्मवीर' असाच करत आला आहे. ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या पोवाड्यात संभाजी महाराजांचा उल्लेख एकदा 'धर्मभास्कर' असा केला होता. अन्यथा 'स्वराज्यरक्षक' हा किताब शंभूराजांना आपल्या मालिकेच्या उच्चांकसाठी राष्ट्रवादीचे निष्ठावंत खासदार अमोल कोल्हे यांनी वापरला. त्या शब्दाचा त्याआधी इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही." विश्वास पाटील यांच्या या पोस्टमध्ये इतिहासाचे अनेक दाखले देखील दिले आहेत. तसेच, त्यांनी 'राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ आलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते' असा टोलादेखील लगावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in