Cabin Cruiser Yacht Fire: मांडवा येथील समुद्रात केबिन क्रूजर याचला भीषण आग; धुराच्या उंच लोटाचे व्हिडिओ समोर

याचवरील मास्टर दिलशाद मारणे हे गंभीर जखमी झाले असल्याचं सांगितलं जात आहे.
Cabin Cruiser Yacht Fire: मांडवा येथील समुद्रात केबिन क्रूजर याचला भीषण आग; धुराच्या उंच लोटाचे व्हिडिओ समोर

मांडावा येथील समुद्रातील मरीन सोल्यूशन्स केबिन क्रूजर याचला आग लागल्याही घटना घडली आहे. Belvedere असं या याचचं नाव आहे. ही घटना आज शनिवारी दुपारच्या सु्मारास घडल्याचं सांगितलं जात आहे. फ्री-प्रेस जर्नलने याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

फ्री-प्रेस जर्नलने शेअर केलेल्या व्हिडिओत समुद्रात असलेल्या या बेल्वेडिअरला आग लागल्याचं दिसत आहे. तसंच यातून धुराचे लोट बाहेर येत असताना दिसत आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी याचवरील मास्टर दिलशाद मारणे हे गंभीर जखमी झाले असल्याचं सांगितलं जात आहे.

Sea Ray ब्रँडची ही लक्झरी पर्सनल मोटार याच बेल्वेडिअर नावाने रजिस्टर आहे. मरीन सोल्यूशन्स कंपनीकडून अशा याच ऑपरेट केल्या जातात. या कंपनीचे मालक गौतम दत्ता आणि त्यांचे वडील निवृत्त लेफ्टनंट जनरल एस. दत्ता हे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in