
मुंबई : ऑगस्ट महिन्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. राज्यातल्या बहुतांश भागांत महिन्याभरात पाऊस असेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यात इतर भागांत पाऊस कोसळणार आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १० सप्टेंबर रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस कोसळणार आहे. रायगड, ठाणे, पुणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, बीड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात मात्र २ दिवस पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज आहे. पण यानंतर विदर्भातही पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे.
पाहुण्यांना गरिबी पण दाखवा -राहुल
जी-२० परिषदेसाठी नवी दिल्लीत आलेल्या विदेशी नेत्यांना दिल्लीतील झोपडपट्टी भाग दिसू नये म्हणून हिरव्या कपड्याने झाकल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर केली आहे. मोदी सरकार देशातील गरीब जनता आणि प्राण्यांना झाकून ठेवत आहे. भारताचे वास्तव पाहुण्यांपासून झाकून ठेवण्याची काहीच गरज नाही, असे राहुल गांधी म्हणाले. एक्सवर पोस्ट करत राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे.