येस बँक आणि डीएचएफएल फसवणूक प्रकरणावर ईडीची कारवाई; ४१५ कोटींची मालमत्ता जप्त

या प्रकरणात एकूण १,८२७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ‘ईडी’कडून टाच आणण्यात आली आहे
येस बँक आणि डीएचएफएल फसवणूक 
प्रकरणावर ईडीची कारवाई; ४१५ कोटींची मालमत्ता जप्त

येस बँक आणि डीएचएफएल फसवणूक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पीएमएलए कायद्यांतर्गत व्यावसायिक संजय छाब्रिया यांची २६१ कोटी रुपयांची, तर पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांची १६४ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या प्रकरणात एकूण १,८२७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ‘ईडी’कडून टाच आणण्यात आली आहे, अशी माहिती ‘ईडी’ अंमलबजावणी संचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

संजय छाब्रिया आणि ‘ईडी’च्या कोठडीत असलेल्या अविनाश भोसले यांच्यावर कारवाई करत दोघांची मिळून ४१५ कोटींची मालमत्ता जप्त केली. भोसलेंचे मुंबईतील डुप्लेक्स फ्लॅट, छाब्रियांची सांताक्रूझमधील आणि बंगळुरूमधील जमीन तसेच सांताक्रूझमधील तीन कोटींचा फ्लॅट जप्त केला. पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा दावा सीबाआयने आरोपपत्रातून केला आहे. त्यांची लंडनमधील मालमत्ताही आता वादात सापडली आहे. तीन दिवसांपूर्वी सीबीआयने अविनाश भोसलेंविरोधात आरोपपत्र दाखल केले, त्यातून ही माहिती समोर आली आहे.

लंडनमधील फाईस ट्रॅक ही आलिशान आणि ऐतिहासिक वारसा असलेली इमारत २०१८मध्ये भोसलेंनी खरेदी केली होती. बर्मिंगहॅम पॅलेसजवळ असलेली ही इमारत २०० खोल्यांच्या हॉटेलमध्ये रूपांतर करण्याचा त्यांचा मनोदय होता. या हॉटेलसाठी एक हजार कोटी रुपयांपैकी ७०० कोटी रुपये कर्ज भोसलेंनी येस बँकेकडून घेतले. त्याचाच तपास सीबीआय करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in