तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी; उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटीलांना खडसावले

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला
तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी; उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटीलांना खडसावले

तुम्ही लगेच खाली बसा. तुमची ही बोलायची पद्धत आहे का? विधान परिषदेत छाती बडवून काय बोलताय, तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी’, अशा शब्दांत गुरुवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना खडसावले.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला, पण त्यांनी आपली बाजू मांडण्याऐवजी अनिल परब यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली. प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी ते मागच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करू लागले. यामुळे नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खाली बसण्याची विनंती केली. मात्र, गुलाबराव पाटील आक्रमक होऊन बोलतच राहिले. यामुळे नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना चांगलेच सुनावले.

‘मंत्री महोदय आपण ताबडतोब खाली बसा, ही बोलण्याची पद्धत नाही, तुमच्या विभागाचा विषय काढलेला नाही, मी इथे तुम्हाला ताकीद देते, केसरकरांच्या शिक्षण विभागाचा प्रश्न आहे, मागच्या कॅबिनेटमध्ये कोण काय करत होतं? हा मुद्दा इथे कशाला काढता? तुम्ही ताबडतोब खाली बसा. सभागृहात वागायची ही पद्धत नाही. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का? तुम्ही चौकात आहात का?’ असा संताप नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

यावेळी गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर देताना ‘मी मंत्री आहे!’ असे सांगितले. यावर नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांची खरडपट‌्टी काढली. ‘तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही, तुम्ही ताबडतोब खाली बसा, छातीवर हात बडवून काय बोलता? तुम्ही ताबडतोब खाली बसा,’अशा शब्दांत नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना सुनावले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in