गोवंडी येथून तरुणीला घातक शस्त्रांसह अटक

शस्त्रे कोठून आणली, या शस्त्रांची ती कोणाला विक्री करणार होती का, या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला किंवा होणार होता, याचा आता पोलीस तपास करत आहेत.
गोवंडी येथून तरुणीला घातक शस्त्रांसह अटक
Published on

मुंबई : गोवंडी येथून एका तरुणीला घातक शस्त्रांसह शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. हिना रिहाल खान असे या २४ वर्षांच्या तरुणीचे नाव असून तिच्या राहत्या घरातून पोलिसांनी एक गावठी कट्टा, एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या हिना खानकडे घातक शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर हिनाच्या राहत्या घरी छापा टाकून एक गावठी कट्टा, एक देशी रिव्हॉल्व्हर आणि दोन काडतुसे जप्त केली. तिने ही शस्त्रे कोठून आणली, या शस्त्रांची ती कोणाला विक्री करणार होती का, या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला किंवा होणार होता, याचा आता पोलीस तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in