तरुणीचा रिप्लाय न आल्यामुळे तरुणाची आत्महत्या

बुधवारी रात्री सुरजने त्या मुलीला खूप मेसेज केले होते, परंतु तिने उत्तर दिले नाही. उत्तर न आल्याने सूरज वैतागला
तरुणीचा रिप्लाय न आल्यामुळे तरुणाची आत्महत्या

ठाणे शहरातील चितळसर- मानपाडा येथील एका २२ वर्षीय तरुणाने प्रेमप्रकरणातून २२ जून रोजी सकाळी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, प्रेमात अपयशी झाल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी सकाळी सुरज सुनील वाघमारे या २२ वर्षीय तरुणाने ठाणे येथील नातेवाइकांच्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. प्रेमात अपयशी सूरजने हे टोकाचे पाऊल उचलले. तो ठाणे (पश्चिम) येथील पोखरण रोड येथे पूजा पॅथॉलॉजी लॅबमध्ये कामाला होता. त्याच्या शेजारीच राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीवर त्याचे प्रेम होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात भांडणे सुरू होती.

बुधवारी रात्री सुरजने त्या मुलीला खूप मेसेज केले होते, परंतु तिने उत्तर दिले नाही. उत्तर न आल्याने सूरज वैतागला होता. त्यातच गुरुवारी त्याने नातेवाईकाच्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश घोडे म्हणाले की, अद्याप आम्हाला घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in