पोलीस ठाण्यातून मोबाईलचोर तरुणीचे पलायन

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील एका पळपुट्या आरोपी तरुणीला साकीनाका पोलिसांनी अटक केली.
पोलीस ठाण्यातून मोबाईलचोर तरुणीचे पलायन

मुंबई : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील एका पळपुट्या आरोपी तरुणीला साकीनाका पोलिसांनी अटक केली. शगुन दिलीप यादव ऊर्फ राणी असे या २० वर्षांच्या तरुणीचे नाव असून तिला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत चौकशीसाठी साकीनाका पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते, यावेळी ती पोलीस ठाण्यातून पळून गेली होती. त्यामुळे तिच्याविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. यातील तक्रारदार घाटकोपर येथून २७ जानेवारी पहाटे साडेपाच वाजता कामावर जात असताना, बाईकवरुन आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याकडील मोबाईल घेऊन पलायन केले होते. आरोपींचा शोध सुरू असताना पोलिसांनी १ फेब्रुवारीला शगुन यादवला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असताना राणी ही पळून गेली होती. तिचा पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर शगुनला परळच्या टाटा रुग्णालयाजवळून ताब्यात घेतले होते. तिला पुढील चौकशीसाठी साकीनाका पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in