सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तरुणाला अटक

धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

मुंबई : पोलीस शिपायाला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हमीद अब्दुल साबीत चौधरी या २१ वर्षांच्या आरोपीला डोंगरी पोलिसांनी अटक केली. धक्काबुक्कीत रामकिसन मारुती मिसाळ यांना दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा डोंगरीतील नूरबाग, सम्राट सदन, बीएमसी इमारतीजवळ मारामारी सुरू असल्याची माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून डोंगरी पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे डोंगरी पोलिसांचे एक विशेष पथक तिथे रवाना झाले होते. यावेळी पोलिसांना पाहताच मारामारी करणारा तरुण त्याच्या बाईकवरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याने रामकिसन मिसाळ यांना धक्काबुक्की करून जोरात धक्का दिला होता. रामकिसन यांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in