.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : एका ३० वर्षीय महिलेला अश्लील ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवून तिचा छळ केल्याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी ३६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मोहम्मद अझीझ मोहम्मद निसार खान असे आरोपीचे नाव असून, तो बेहरामपाडा (वांद्रे-पूर्व) परिसरात पराठ्याचे दुकान चालवतो व तेथेच राहतो.
त्याच्याविरुद्ध निर्मलनगर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान याने मुंबईतील २५ महिलांचा छळ करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली आणि न्यायालयाने त्याला १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीचे दोन मुले असून त्याचे कुटुंब उत्तर प्रदेशात राहते.
वांद्रे येथील एका ३० वर्षीय गृहिणीला १४ जून रोजी एका अनोळखी नंबरवरून फोन आला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. फोन करणाऱ्या व्यक्तीने अश्लील शेरेबाजी केल्यानंतर तिला अश्लील मजकूर असलेली ऑडिओ क्लिप पाठवण्यास सुरुवात केली. यानंतर निर्मलनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.