एमडी ड्रग्जसहित तरुणाला अटक

लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली
एमडी ड्रग्जसहित तरुणाला अटक

मुंबई : १३ लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसहित अहमद रजा मोहम्मद रफिक खान या २१ वर्षांच्या तरुणाला कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ६५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, दोन मोबाईल आणि पाच हजाराची रोख असा १३ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यातआला असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

जोगेश्‍वरी येथील एस. व्ही रोड, ओम ग्लास स्टुडिओजवळ काही तरुण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. शनिवारी सायंकाळी तिथे अहमद रजा खान आला असता त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १३ लाखांचे एमडी ड्रग्ज सापडले. अहमद रजा हा जोगेश्‍वरीतील ओशिवरा, गुलशननगरचा रहिवाशी आहे. त्याला ते एमडी ड्रग्ज कोणी दिले आणि तो कोणाला ड्रग्जची विक्रीसाठी आला होता, याचा आता पोलीस तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in