लव्ह जिहादच्या आरोपांखाली वांद्रे स्थानकाबाहेर तरुणाला मारहाण ; वारिस पठाण म्हणाले...

या तरुणाची मैत्रीण यावेळी जमावाला विरोध करताना दिसत आहे. हा जमाव तरुणाला मारहाण केल्यानंतर स्थानकाबाहेर ओढून...
लव्ह जिहादच्या आरोपांखाली वांद्रे स्थानकाबाहेर तरुणाला मारहाण ; वारिस पठाण म्हणाले...

वांद्रे टर्मिनस येथे तरुणीसोबत बाहेर गेलेल्या तरुणाला लव्ह जिहादच्या आरोपाखाली बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप माजी आमदार वारिस पठाण यांनी केला आहे. पठाण यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केला आहे. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधातगुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर तरुणीसोबत फिरायला गेलेल्या तरुणाला लव्ह जिहादचा आरोप करत जमावाने बेदम मारहाण केली. हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडिओत लाल शर्ट घातलेल्या एका तरुणाला जमावाकडून मारहाण होताना दिसत आहे. या तरुणाची मैत्रीण यावेळी जमावाला विरोध करताना दिसत आहे. हा जमाव तरुणाला मारहाण केल्यानंतर स्थानकाबाहेर ओढून नेताना या व्हिडिओत दिसत आहे. यानंतर जमावाकडून 'जय श्री राम'च्या घोषण देखील दिल्या जात असल्याचं या व्हिडिओ दिसत आहे.

माजी आमदार वारिस पठाण यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून मुंबईत अशी घटना घडते हे अतिशय लाजीरवाणं असल्याचं म्हटलं आहे. वांद्रे स्थानकारव लव्ह जिहादच्या नावाखाली जेएसआरचा नारा देणाऱ्या हिंदुत्ववादी गुंडांनी एका नि:शस्त्र मुस्लिम मुलाला निर्दयपणे मारहाण केली. आरपीएफच्या कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित होता. तरी देखील कोणतीही अॅक्शन घेण्यात आली नाही. देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनी हा प्रकार घडत असल्याचं पठाण म्हणाले.

यावेळी बोलताना पठाण म्हणाले की, जर काही गुन्हा केला असेल तर त्यासाठी पोलीस प्रशासन आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की, व्हिडिओतील मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करा. तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं.

logo
marathi.freepressjournal.in