
मुंबई : झोपेत चालण्याची सवय असलेल्या मुस्तफा इब्राहिम छुनावाला (१९) या युवकाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. माझगावच्या नेसबीट रोडवरील ॲॅक्वाजेम टॉवरमध्ये सकाळी ५ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. मुस्तफा इब्राहिम छुनावाला हा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तत्काळ सैफी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. छुनावाला हा झोपेत चालण्याच्या विकाराने ग्रस्त होता.