इलेक्ट्रीक शॉक लागून तरुणाचा मृत्यू

स्टॅडिंग फॅन हलवत असताना अचानक त्याला इलेक्ट्रीक शॉक लागला
इलेक्ट्रीक शॉक लागून तरुणाचा मृत्यू

मुंबई : इलेक्ट्रीक शॉक लागून निलेश भरत भिडे या ३१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. मुलुंडच्या राजेश्‍वरी मंदिरात घडलेल्या या घटनेने स्थानिक भक्तांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. याप्रकरणी निलेशच्या भावाच्या जबानीवरून मुलुंड पोलिसांनी एडीअरची नोंद केली आहे. निलेश हा मुलुंड येथे राहत असून, त्याचा स्वतचा मोबाईल शॉप आहे. गुरुवारी तो एलबीएस मार्गावरील राजेश्‍वर मंदिरात भजनाच्या कार्यक्रमासाठी आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर तो मंदिरात साफसफाई करत होता. यावेळी तिथे असलेला स्टॅडिंग फॅन हलवत असताना अचानक त्याला इलेक्ट्रीक शॉक लागला. त्यात तो बेशुद्ध झाला होता. त्याला तिथे उपस्थित लोकांनी फोर्टीज रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in