झी न्यूजचे सूत्रसंचालक रोहित रंजन यांनी जाहीर माफी मागावी - भाई जगताप

मुंबईतील लोअरपरेल येथील मॅरेथॉन बिल्डिंग मधील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
झी न्यूजचे सूत्रसंचालक रोहित रंजन यांनी जाहीर माफी मागावी - भाई जगताप

झी मीडियाच्या डीएनए कार्यक्रमात सूत्रसंचालक रोहित रंजन यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात अपशब्द वापरून खोटे आरोप केले आहेत. त्याविरोधात शनिवारी मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतत्वाखाली झी न्यूजच्या मुंबईतील लोअरपरेल येथील मॅरेथॉन बिल्डिंग मधील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.

यावेळेस बोलताना भाई जगताप म्हणाले की, झी न्यूजचे सूत्रसंचालक रोहित रंजन यांनी काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात अपशब्द वापरून खोटे आरोप केलेले आहेत हे अतिशय निंदनीय आहे. त्याचा आम्ही मुंबई काँग्रेसतर्फे तीव्र शब्दांत निषेध करतो. याबद्दल सूत्रसंचालक रोहित रंजन आणि झी न्यूज चॅनेलला माफी मागावीच लागेल. त्यांनी झी न्यूज च्या प्राईम टाईम स्लॉटच्या ‘डीएनए’ या कार्यक्रमात सुरुवातीलाच जाहीर माफी मागावी, अशी आमची मागणी आहे, अन्यथा मुंबई काँग्रेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in