गोंदियामध्ये अपघातात १ ठार, ११ मजूर जखमी

हैदराबादहून मध्य प्रदेशातील लांजीकडे मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला सोमवारी गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील मिलटोली गावाजवळ भीषण अपघात झाला.
गोंदियामध्ये अपघातात १ ठार, ११ मजूर जखमी
प्रातिनिधिक फोटो

गोंदिया : हैदराबादहून मध्य प्रदेशातील लांजीकडे मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला सोमवारी गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील मिलटोली गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १ मजूर ठार, तर ११ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी बसचालक मोहित उमाप्रसाद किरसान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हैदराबादवरून ३५ मजुरांना घेऊन लांजीकडे जाणाऱ्या पायल ट्रॅव्हल्सच्या चालकाचे मिलटोली परिसरात बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्यालगतच्या राईस मिलच्या मजुरांच्या क्वार्टरला धडकली. त्यात चालकासोबत केबिनमध्ये बसलेले १२ जण जखमी झाले. त्यांना गोंदियातील केटीएस सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. थानसिंग यादव (३०) असे मृताचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे.

logo
marathi.freepressjournal.in