मोठी बातमी! छत्तीसगडच्या दंतेवाडात नक्षलवाद्यांचा हल्ला; १० जवान आणि १ चालक शहीद

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट घडवून आणला, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वाहिली श्रद्धांजली
मोठी बातमी! छत्तीसगडच्या दंतेवाडात नक्षलवाद्यांचा हल्ला; १० जवान आणि १ चालक शहीद

आज छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील दंतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट घडवून आणला. या हल्ल्यात ११ जवान शहीद झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या भागात नक्षलवादी कारवाया कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आज झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सध्या याठिकाणी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्डसह जवानांचे एक पथक नक्षल विरोधी मोहिमेसाठी रवाना झाले. या मोहिमेवरून परतत असताना अरनपूर मार्गावर आयईडी ब्लास्ट घडवण्यात आला. या भीषण स्फोटामध्ये १० डीआरजीचे जवान आणि एका वाहन चालक शहीद झालेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in