गेलच्या निव्वळ नफ्यात १० पटीने वाढ; कंपनी निकाल

कंपनीने सोमवारी ही माहिती नियामकाला दिली. देशातील सर्वात मोठ्या गॅस ट्रान्समिशन आणि मार्केटिंग कंपनीचा स्टँडअलोन निव्वळ नफा एप्रिल २०२३ मध्ये सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये २,८४२.६२ कोटी झाला.
गेलच्या निव्वळ नफ्यात १० पटीने वाढ; कंपनी निकाल

नवी दिल्ली : सरकारी मालकीची गॅस युटिलिटी गेल (इंडिया) लिमिटेडच्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात १० पट वाढ झाली. कंपनीने सोमवारी ही माहिती नियामकाला दिली. देशातील सर्वात मोठ्या गॅस ट्रान्समिशन आणि मार्केटिंग कंपनीचा स्टँडअलोन निव्वळ नफा एप्रिल २०२३ मध्ये सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये २,८४२.६२ कोटी झाला. एका वर्षापूर्वी वरील तिमाहीत २४५.७३ कोटींचा निव्वळ नफा झाला होता, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

गॅस वाहतूक व्यवसायातील करपूर्व उत्पन्नामुळे ही रक्कम जवळपास तिपटीने वाढून रु. १,२१५.०७ कोटी झाली आहे. पेट्रोकेमिकल्स व्यवसायाने एक वर्षापूर्वी रु. ३४९ कोटींच्या तोट्याच्या तुलनेत रु. ६२ कोटींच्या करपूर्व नफ्यासह उलाढाल केली. ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल जवळपास ३४,२५३.५२ कोटी रुपये होता. ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी ९८,३०३.६१ कोटी रुपयांच्या महसुलावर निव्वळ नफा ४२ टक्क्यांनी वाढून ६,६५९.५१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

बीपीसीएलच्या तिसऱ्या तिमाहीच्या निव्वळ नफ्यात ८२ टक्क्यांनी वाढ

सरकारी मालकीच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने सोमवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या डिसेंबर तिमाहीच्या निव्वळ नफ्यात ८२ टक्क्यांनी वाढ नोंदवली. तेलशुद्धीकरण नफ्यात आणि इंधन विक्रीवरील नफ्यात वाढ झाल्याने एकत्रित निव्वळ नफा ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रु. ३,१८१.४२ कोटी म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील रु. १,७४७.०१ कोटी निव्वळ नफा झाला होता.

तथापि, त्याचा नफा मागील तिमाहीत (जुलै-सप्टेंबर २०२३) रु.८,२४३.५५ कोटींच्या तुलनेत कमी झाला आहे. कच्च्या मालाच्या (कच्च्या तेलाच्या) किमती कमी झाल्या असूनही, इंधनाच्या किमती तब्बल २१ महिने स्थिर ठेवले असतानाही नफा वाढण्यास मदत झाली. ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान कच्च्या तेलाचे प्रत्येक बॅरल पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनात बीपीसीएलने अंदाजे १३.३ अमेरिकन डॉलर्स मिळवले. इंधन विपणनातून करपूर्व नफा तिसऱ्या तिमाहीत रु. ४,३७२.९३ कोटी झाली आहे. एका वर्षापूर्वी रु. २,६१८.९५ कोटी झाला होता. परंतु जुलै-सप्टेंबर या कालावधीतील विक्रमी रु. ११,२८३.२९ कोटींपेक्षा कमी आहे. त्याचा ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल १.३ लाख कोटी रुपये झाला.

अदानी ग्रीन एनर्जीचा निव्वळ नफा २५६ कोटींवर

नवी दिल्ली : अदानी ग्रीन एनर्जीच्या डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तीन महिन्यांत एकत्रित निव्वळ नफ्यात १४८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, मुख्यत: २०२३ रोजी संपलेल्या तीन महिन्यांत तो २५६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. महसुलात मोठी वाढ झाल्याने नफ्यातही वाढ झाल्याचे कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वर्षभरापूर्वी १०३ कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून २,६७५ कोटी रुपये झाले, जे मागील वर्षी याच कालावधीत २,२५६ कोटी रुपये होते. नुकत्याच जाहीर केलेल्या इक्विटी आणि कर्ज भांडवलाच्या वाढीसह, आम्ही २०३० पर्यंत लक्ष्यित ४५ गिगावॉट क्षमतेसाठी भांडवलाचे व्यवस्थापन तयार केले आहे, असे अदानी ग्रीन एनर्जीचे सीईओ अमित सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in