१० राज्यांना लवकरच हुडहुडी; येत्या ८ दिवसांत पारा १७ अंशांपर्यंत घसरणार

सध्या उत्तर आणि पश्चिमेकडून मध्य भारताकडे कोरडे उत्तर-पश्चिम वारे वाहत आहेत
१० राज्यांना लवकरच हुडहुडी; येत्या ८ दिवसांत पारा १७ अंशांपर्यंत घसरणार

मान्सूनने काढता पाय घेतल्यानंतर ऑक्‍टोबर महिन्याअखेरीस हवामानातही मोठा बदल होणार आहे. देशात एकाच वेळी सक्रिय असलेल्या दोन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणामध्ये ६ ते ७ नोव्हेंबरदरम्यान तापमानात झपाट्याने घट होणार आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात जवळपास ११ ते १७ अंशांचा फरक पडण्याची शक्यता आहे. येत्या ८ दिवसांत पारा १७ डिग्रीपर्यंत घसरेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

सध्या उत्तर आणि पश्चिमेकडून मध्य भारताकडे कोरडे उत्तर-पश्चिम वारे वाहत आहेत. उत्तरेकडील पर्वतरांगांवर बर्फवृष्टी झाल्यानंतर हे वारे बर्फाच्छादित भागातून जातील आणि थंडी घेऊन मध्य भारतात पोहोचतील. त्यामुळे ६ नोव्हेंबरपासून देशातील दोन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर ते मध्य भारतात दिवसाही थंडी जाणवेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

यंदा पुढील चार महिने थंडीचे

ऑक्टोबर महिना संपताच देशातील हवामानात मोठा बदल होणार आहे. गुलाबी थंडीचे रूपांतर कडाक्याच्या थंडीत होईल. पुढील एक आठवड्यात देशात दोन पश्चिमी विक्षोभ येणार आहेत. त्यामुळे ६ नोव्हेंबरपासून मध्य भारतापर्यंत दिवसा गारठा राहील. एवढेच नाही, तर पुढील चार महिने पहाडी राज्यांपासून मध्य भारतातील राज्यांत कडाक्याची थंडी पडू शकते.

सध्या उत्तर, पश्चिम भारतापासून मध्य भारतापर्यंत शुष्क वायव्य वारे वाहत आहेत. उत्तरेच्या पहाडांवर बर्फवृष्टीनंतर ही हवा बर्फाळ भागांतून जात मध्य भारतापर्यंत गारठा आणेल. त्यामुळे ६-७ नोव्हेंबरला पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानबरोबरच गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणापर्यंत तापमानात वेगाने घट होईल. दिवस आणि रात्रीच्या तापमानात ११ ते १७ अंश सेल्सिअस इतका मोठा फरक राहील.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in